भजनी मालिका

भजने

बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी ॥१॥ येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण झालें संतां पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरवें गा शंकरा नाम तुझें । हरहर बरवे गा देवा नाम तुझें ॥१॥ गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती । रामनामें तरले नेणों किती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरवें झालें बरवें झालें । आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥ सद्गुरुनीं कृपा केली । वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥ न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । झालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरवें बरवें बाळ कोडीसवाणेरे । यशोदा म्हणे दृष्टी होईल बारे ॥१॥ बरवी बरवी डोळस सांवळी । कोण उतरोनी हरीची पाउली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बरवेपणें बरवा बाप मदनाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥१॥ उदारपणें उदार दाता त्रैलोक्याचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥१॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम