भजनी मालिका

भजने

फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फिरविसी मान तरी पिंग्याच्या महिमान । नाहींतरी सरे परती जाई वो येथून ॥१॥ धरी हरि चित्तीं गे पिंगयाच्या निगुती । नाहींतरी वायां जासी भोवंडीचे भ्रांती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

फुकाचिया तुळसी वहारे । ध्रुवासारिखें पद मागारे ॥१॥ एका विठ्ठला शरण जारे । जन्म वांयां कां दवडारे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

फुंकिसी जगा गडी गे तरि घालीं फुगडी । नाहीं तरी नको करुं फजिती रोकडी ॥१॥ मोडीं आंग बाई गे नाचण्याचे सोयी । आठवूनि श्रीहरिचा निजानंद देहीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फुटल्या घडयाचें नाहीं नागवणें । संसार भोगणें तेनें न्यायें ॥१॥ स्वप्नींची मात जागृतीस सांगे । तैसा भवरोग प्रारब्धाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

फुलले अनेक तरुवर तेथ । दुर्वा दर्भ आंत डंवरले ॥१॥ करंज जांभळी लागली एक थाटी । वरी बहु दाटी तरुवरांची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

फुलाचे अंगीं सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥ मृत्तिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांझण माथण घागरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

फेडूनि पीतांबर उभा दिगंबर । कटीं ठेवूनि कर वा-ळवंटीं ॥१॥ मोतियांचे हार सांडूनि रत्नकीळा । तुळशीच्या माळा गळां घाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव