भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुटल्या घडयाचें नाहीं नागवणें । संसार भोगणें तेनें न्यायें

phutalya ghadayachen nahin nagavanen | sansar bhoganen tenen nyayen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
फुटल्या घडयाचें नाहीं नागवणें । संसार भोगणें तेनें न्यायें ॥१॥ स्वप्नींची मात जागृतीस सांगे । तैसा भवरोग प्रारब्धाचा ॥२॥ नामा ह्मणे आतां जाणा तो संसार । वाउगा पसार जाय जाणा ॥३॥