भजनी मालिका

भजने

फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बकाचिये परि ध्यान नको धरुं । जीवेभावें धरुं संतचरण ॥१॥ मग ते तात्काळ करिती पावन । ऐसें अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बघायाला गेले क्रियामण शिडी घालूनियां उडी तेथें आले ।।१।। पुरवी या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देहीं ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

बंधनाचा फांसा बैसलासे गळीं मीनापरि गिळी सर्वकाळ ॥१॥ आमीष विषया भुलला पामर । भोगिती अघोर चौर्‍यायंशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बंधनीं गुंतला देखोनियां पती । उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥ देहाची ते आस सांडोनि लवलाही । पडे रडे कांहीं बोल बोले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दर्शन । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरवा बरवा बरवा देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥ पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरवा वो हरि बरवा बो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥ सावळा वो हरि सावळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥ध्रु०॥

बरवी आजी हे जोडी झाली । तुमचीं पाउलें देखिलीं । अवघींच इंद्रियें निवालीं । आलिंगनीं तुमचिया ॥१॥ वदनीं आठवलें नाम । तुमचें सांपडलें प्रेम । बरवा साधला हा नेम । मनही विश्राम पावलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बरवी श्रीहरीची मूर्ती । देव्हारा पूजिली होती । बारे हा लक्ष्मीचा पती । दुध मागे तयासी ॥१॥ ऐशीं तिघें उपवास करिती । मातापितरें चिंतेत पडती । जन मिळाले बहुती । तयासी उठवूं आदरिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥ विचारुनी ऐसें बोलिेलें सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा