भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवा ओढवला हा रंग । भक्तिप्रसंग तुमचा

barava odhavala ha rang | bhaktiprasang tumacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरवा ओढवला हा रंग । भक्तिप्रसंग तुमचा ॥१॥ तेणें सुखें मातली वाचा । नित्य कीर्तनाचा नटनाच ॥२॥ गाऊं वानूं आपुल्या छंदें । तुमचीं पदें आवडीं ॥३॥ निळा म्हणे गळती नयन । प्रेमें स्फुंदन सद्रद ॥४॥