भजनी मालिका
← भजनांकडे परत

बंधनीं गुंतला देखोनियां पती । उडालीसे वृत्ति हर-णीची

bandhanin guntala dekhoniyan pati | udalise vrutti har-nichi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बंधनीं गुंतला देखोनियां पती । उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥ देहाची ते आस सांडोनि लवलाही । पडे रडे कांहीं बोल बोले ॥२॥ ह्मणे तुह्मी आतां नव जावें एकलें । संगें आह्मां नेलें पाहिजे जी ॥३॥ बहुता जन्मांची तुह्मां आम्हां गांठी । आतां कैसी तुटी पाडितसां ॥४॥ भोम जे भोगिले स्वप्रप्राय झाली । नाहीं ते पुरली वासना हे ॥५॥ नामा ह्मणे विषयवासना वोंगळा । तेणें कोण्या काळें सुटिजेना ॥६॥