भजनी मालिका

भजने

बहु कनवाळु होसी गा देवराया । म्हणोनि सखया शरण आलों ॥१॥ निवारीं या तापापासोनी सोडवीं । करूणा भाकावी किती तुम्हां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥ संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥ कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं ॥१॥ जाई जाई पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचातो फेरा । तेणें चुके ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥ आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहु दिस होतों तुमचां गांवीं । आतां कृपा असों द्यावी ॥१॥ आम्ही जातों आपुल्या गांवा । विठोबा लोभ असों द्यावा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बहु नांवें ठेविलीं स्तुतीची आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥ बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमटयाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहु पुण्य होय गांठीं । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या ॥१॥ देही असोनि विदेहि । करुनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाहीं । वाटाघाटी तयांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ