भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला

bahu dhir kela | jan na hosi viththala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥ आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥ झालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥ तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥