भजनी मालिका

भजने

बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्ती । कृपावंत मानसीं ॥१॥ म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें ॥१॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ्य ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥ येथें सावकासें घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुता देऊनी अभयदानें । गौरविलें आपल्या मनें । घालूनी शांतीचीं आसनें । ब्रम्हसाम्राज्यीं बैसविलें ॥१॥ ध्यानतन्मयाचीं छत्रें । माथां झळकतीं विचित्रें । अगाध कीर्तीचीं दिव्य वस्त्रें । प्रल्हादादिकां समर्पिलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बहुतां पुंण्याचे कष्ट । त्यासी प्राप्त हें वैकुंठ ॥१॥ तैसी नोहे ही पंढरी । पतित पापियातें तारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बहुतां येणें नागविलें । हरुनी सर्वस्वही नेलें ॥१॥ करुं जातां याची गाठी । जिवीं जिवा घाली मिंठी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बहुतां सुकृतां नरदेह लाधला । भक्तिवीण गेला अधोगती ॥१॥ बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मुढा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुतांची मतांतरें तीं टाकुनीं । विठ्ठलचरणीं बुडी दें कां ॥१॥ नव्हें तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तु गोविंदा प्रेमभरीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुतापुण्यें करूनि जोडला नरदेह । नाहीं त्याचा वेवसाव घडला कांहीं ॥१॥ न करावें तें केलें मनामागें धांवणें । परि नारायणें करुणा केली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिल्यां पुंडलिका ॥१॥ करुनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट करीं देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ