भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या

bahutanchya amhi na milo matasi | koni kaisi kaisi bhavanechya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥ध्रु.॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥२॥