भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां येणें नागविलें । हरुनी सर्वस्वही नेलें

bahutan yenen nagavilen | haruni sarvasvahi nelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बहुतां येणें नागविलें । हरुनी सर्वस्वही नेलें ॥१॥ करुं जातां याची गाठी । जिवीं जिवा घाली मिंठी ॥२॥ पाहिलाचि पुरे । उरों नेदी त्या दुसरें ॥३॥ निळा म्हणे चेटकी ऐसा । स्वाभाव त्याचा सांडिल कैसा ॥४॥