भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुरुपी हा एकला । नानाकारें नटें नटला

bahurupi ha ekala | nanakaren naten natala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बहुरुपी हा एकला । नानाकारें नटें नटला ॥१॥ पुरुषाकृति स्त्रिया बाळें । होउनी कोणाही नातळे ॥२॥ नामें रुपें वस्त्राभरणें । रसस्वाद नाना खाणें ॥३॥ निळा म्हणे फळें पुष्पें । पर्णे मूळें भिन्नचि रुपें ॥४॥