भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्ती । कृपावंत मानसीं

bahutan janminchen sanchit | sabal hoy jari bahut | tari chi hoy haribhakti | krupavant manasin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्ती । कृपावंत मानसीं ॥१॥ म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥ तुका म्हणे निर्वीकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥