भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां सुकृतां नरदेह लाधला । भक्तिवीण गेला अधोगती

bahutan sukrutan naradeh ladhala | bhaktivin gela adhogati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुतां सुकृतां नरदेह लाधला । भक्तिवीण गेला अधोगती ॥१॥ बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मुढा ॥२॥ अनेका जन्माचें सुकृत पदरीं । त्याचें मुखा हरि पैठा होय ॥३॥ राव रंक हो कां उंच नीच याती । भक्ति विण माती मुखीं त्याच्या ॥४॥ एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५॥