भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु नांवें ठेविलीं स्तुतीची आवडी । बहुत या गोडी आली रसा

bahu nanven thevilin stutichi avadi | bahut ya godi ali rasa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु नांवें ठेविलीं स्तुतीची आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥ बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमटयाचा ॥ध्रु.॥ बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥ बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥