भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण

bahu khelatan khel | kalon ale sakal | shevatin ten nirphal | jalen balakrushna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥ कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥ आम्हीं न खेळु विटिदांडुं । भोवरं लागोर्‍या रे चेंडु । एकीबेकीतें सांडुं । मीतूपण अवघें खंडुं रे कान्होबा ॥२॥ लक्ष लावुं तुझे खेळा । न गुंतु आणिका चाळा । एका जानर्दनीं पाहुं डोळां तुझ्या खेळाची अगम्य लीला रे कान्होबा ॥३॥