भजनी मालिका
← भजनांकडे परत

फेडूनि पीतांबर उभा दिगंबर । कटीं ठेवूनि कर वा-ळवंटीं

pheduni pitambar ubha digambar | katin thevuni kar va-lavantin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
फेडूनि पीतांबर उभा दिगंबर । कटीं ठेवूनि कर वा-ळवंटीं ॥१॥ मोतियांचे हार सांडूनि रत्नकीळा । तुळशीच्या माळा गळां घाली ॥२॥ पर्यंक शयन शेषाचें आसन । सांडूनि निधान उभा विटे ॥३॥ सांडूनियां भक्त सनकादिकीं प्रेमा । कलियुगीं नामा आवडला ॥४॥