भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुंकिसी जगा गडी गे तरि घालीं फुगडी । नाहीं तरी नको करुं फजिती रोकडी

phunkisi jaga gadi ge tari ghalin phugadi | nahin tari nako karun phajiti rokadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
फुंकिसी जगा गडी गे तरि घालीं फुगडी । नाहीं तरी नको करुं फजिती रोकडी ॥१॥ मोडीं आंग बाई गे नाचण्याचे सोयी । आठवूनि श्रीहरिचा निजानंद देहीं ॥२॥ त्या नांव फुगडी गे बंधनातें तोडी । नाहीं तरि कांपवूनि काय टिया मांडी ॥३॥ निळा म्हणे जोडी गे देवासवें गडी । आठवूनि ध्यानीं मनीं रुप घडी घडी ॥४॥