भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू

phugadi phu savati majhe tun | haguni bharalen dhu tujhya dhunga tondavari thu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥ हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥ सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥ तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥