भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें गा शंकरा नाम तुझें । हरहर बरवे गा देवा नाम तुझें

baraven ga shankara nam tujhen | harahar barave ga deva nam tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बरवें गा शंकरा नाम तुझें । हरहर बरवे गा देवा नाम तुझें ॥१॥ गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती । रामनामें तरले नेणों किती ॥२॥ ऐसा सदा आनंद राउळीं । विष्णुदास नामा पंढरपुरीं ॥३॥