भजनी मालिका
← भजनांकडे परत

बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी तें

baradiyachi avadi pure | jaya jhure sathi ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी तें ॥१॥ तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥ भागलिया पेणें पावे । विसांवे तें टाकणीं ॥२॥ तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥