भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें

baraven aisen alen mana | narayana ya kalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥ देव आह्मा प्राणसखा । झालें दुःखा खंडण ॥ध्रु.॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥ तुका म्हणे निजठेवा । होईल देवा लाधलों ॥३॥