भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें

baraven majhya kelen manen | panthen yenen nighalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥ अभयाचे जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥ साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥ तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥