भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें

baren ahman kalon alen devapan | atan guj kon rakhe tujhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥ जें आह्मी बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥ निलाजरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा मज ॥३॥ खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बाईल तूं देवा भारवाही ॥५॥ लटिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥ तुका म्हणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥