भजनी मालिका

भजने

निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥ चहूं वांचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापाला सर्वांघटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला ॥१॥ कान्होबा हें बोलणें माझें कोडें । पंचाविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्गुण निरामय संचले । गुणीतीत रुपा आलें । परात्पर तें सगुण झालें । उभें ठाकलें विटेवरी ॥१॥ कोटी कंदर्पाच्या दीप्ति । विराजली अंगकांति । गुणलावण्याची संपत्ती । विठ्ठल मूर्ति गोजिरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥ एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

निर्गुण सगुण नव्हे तें समान । तैसें तेंही जाण योगा-भ्यासीं ॥१॥ प्रल्हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्गुण सगुण नाहीं ज्या आकार । होऊनि साकार तोचि ठेला ॥१॥ जळीं जळगार दिसे जैशा परी । तैसा निराकारी साकार हा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे ॥१॥ डेळियांची धनी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ।। १॥ कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरिराया ।।२।।

रचनाकार: संत गोणाई

निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ॥१॥ कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरीराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना । तुन नारायणा शोधीं नामीं ॥१॥ काय तुझी भीड धरावी म्यां आतां । कृपाळु अनंता म्हणें ना मी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निर्गुणा अंगी सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥ शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गबाळा अवघी कहाणी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥ १ ॥ अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥ १ ॥ मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा