भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाची छाया सगुणीं बिंबली

nirgunachi chhaya sagunin bimbali

निर्गुणाची छाया सगुणीं बिंबली । तत्त्वीं तत्त्वे गेली अनुठाया ॥१॥ निश्चळीं निश्चळ नलगे आळुमाळ । तत्त्वता अढळ तें वेगळेची ॥२॥ नातळतां पंथी शब्दाचा सुहावा । परेसहित दोहावा भरला दिसे ॥३॥ ज्ञानदेवी रम्य दिसोनि न दिसे । निराकारी भासे तदाकारें ॥४॥