भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण सगुण नव्हे तें समान । तैसें तेंही जाण योगा-भ्यासीं

nirgun sagun navhe ten saman | taisen tenhi jan yoga-bhyasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्गुण सगुण नव्हे तें समान । तैसें तेंही जाण योगा-भ्यासीं ॥१॥ प्रल्हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥ अर्जुनासी देव उभा पाचारासी । सखा उद्धवासी साक्ष दावी ॥३॥ नामा म्हणे माझा केशिराज भोळा । दाविसी गो-पाळां बाळलीळा ॥४॥