भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणा अंगी सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें

nirguna angi sagun banalen | nirgun sagun ekatva alen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
निर्गुणा अंगी सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥ शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गबाळा अवघी कहाणी ॥२॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळियेलें ॥३॥ चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥