भजनी मालिका

भजने

निरंजनीं वनीं पाषाण पैं व्हाव्वें । परी जन्मा न यावें मागत्याच्या ॥१॥ राजाचें लेकरूं पांघरे वाकळ । तेव्हां तें सकळ लाज कोणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निरंतर तुमच्या नामाचें स्मरण । आठवीन गुण वेळोवेळां ॥१॥ रुप दृष्टीं पाय ध्याईन मानसीं । हाचि अहर्निशी निजध्यास ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निरंतर तुह्मीं करावा विचार । भवाब्धीचा पार होय कैसा ॥१॥ जन्म गेलें वांयां विषयाचे संगें । भुलले वाउगे माया मोहें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निरंतर नाम जपे । पिता प्रर्‍हादास कोपे । उदरा आला वैरिरूपें । ह्मणवूनि धायीं त्रासिला ॥१॥ कोपें कोपला नर-हरी । कवण तयातें सांवरी । खटखटा वाजती दांतोरी । दैत्यावरी । उठावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निरपेक्ष निर्द्वद तोचि ब्रह्माज्ञानी । नायकेचि कानीं परापवाद ॥१॥ सर्वदा सबाह्म अंतरीं शुचित्व । न देख न दावी महत्व जगीं वायां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वहिलें धरिलें पोटीं ॥१॥ सांवत्याचें अंतरीं झळके पीतांबर । नाम्यानें सत्वर वोळखिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निरसिया वरू आपरूपें । नुपजता लग्न लाविलें बापें ॥१॥ निरासिया वरू निरासिया वरू । निरासी गमला केला संसारू ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझें ॥१॥ पिंड आणि ब्रह्मांड म्हणिजे अखम्ड । याहुनी उदंड स्वरुप माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥ माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

निराकारींचें नाणें । शुद्ध ब्रम्हींचें ठेवणे ॥१॥ प्रयत्नें काढिलें बाहेरी । संतसाधु सवदागरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव