भजनी मालिका

भजने

नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती । जे कां अन्नदान करिती । ते पार्वती वैकुंठीं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य आह्मां सुख तुझ्या पायांपासीं । शरण कोणासी जाऊं आह्मीं ॥१॥ सकाळीं उठोनि ऐकतों कीर्तन । तेणें समाधान मज होय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य कथाश्रवणीं प्रीती । चित्तवृत्ति अर्थातरीं ॥१॥ तेचि आधिकारीं या सुखा । स्वानुभव निका पावती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य काळ जेथें नामाचा घोष । तेथें जगन्निवास लक्ष्मीसहित ॥१॥ ब्रह्माज्ञान तेथें लोळती अंगणीं । सेवुनी पायवणी घरी राहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढें ॥१॥ घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥ त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥ अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥१॥ आल्हादें वैष्णव करती नामाचा घोष । हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य नूतन तुम्ही नवे । आम्हीं तों जिवें वेंचतो ॥१॥ जाणें येणें आम्हा आटी । कल्पकोटीं तुम्हां जिणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥ जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य नेम आह्मां चिंतन श्रीरामा । आणिक उपमा नेघों नेघों ॥१॥ वळघलों हरि भूत भाव निर्धारी । दिसे चरा-चरीं हरिरूप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव