भजनी मालिका

भजने

नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । येणें उच्चारावें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥ नामें कर्माचा सुटे उपाधी । नामें तुटे आधी व्याधी । नामें शोक संदेह बुद्धी । नासतसे हरिनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य नैमित्तिक कर्मे आचरावीं । तिहीं तें पावावी चित्तशुद्धि ॥१॥ चित्त स्थिर होण्या करी उपासना । भजे नारायणा एका भावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य प्रेमाचें पेटें बांधीं माझे पोटीं । उतरीं जगजेठि पैलपार ॥१॥ निरोभिवरे ऐक्य तीरीं । कां पद्मळा पंढरपुरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य वदनीं हरीचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥१॥ त्याच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य श्रीहरीचें आठवितें गुण । वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण । ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण । करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो ॥१॥ येथे आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं अनुदिनी हेंचि अनुष्ठान वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य सर्वगत अखंड सगुण । केशवाचें ध्यान करी ब्रह्म ॥१॥ ब्रह्मा सर्वकाळ सांगे साधूपाशीं । आणिक हे शेषीं तेंचि मानी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य हरिकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा ॥१॥ नाहीं कधीं द्वैत सदा तें अद्वैत । अभेदरहित सर्वकाळक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य हाटपाय आचार सपाट । कारभार दाट असत्याचा ॥१॥ कैंचे सोवळें कैंचें ओवळें । प्रातःकाळीं शिळें भक्षिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नित्य हातानें वारावें । ह्रदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥ ऐसा स्वरूपाचा पूर । आला आसे नेत्नावर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य हातानें वारावें । ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥ ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

नित्य हे दिवाळी असे पंढरपुरी । ओंबाळिती नारी विठठलासी ॥१॥ पांवा वाजे वेणु बरविया नांदे । नामघोष आ-नंदें नाचतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव