भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य हातानें वारावें । ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें

nitya hatanen varaven | hruday antarin prerit javen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नित्य हातानें वारावें । ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥ ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥२॥ स्वरुपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥ जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥