भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य हाटपाय आचार सपाट । कारभार दाट असत्याचा

nitya hatapay achar sapat | karabhar dat asatyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य हाटपाय आचार सपाट । कारभार दाट असत्याचा ॥१॥ कैंचे सोवळें कैंचें ओवळें । प्रातःकाळीं शिळें भक्षिताती ॥२॥ कैंचे चोखटपण अंतरीं मळीन । दिसे कळाहीन पापिष्ठ तो ॥३॥ एका जनार्दनीं अवघा अनाचार । दाविती आचार वरीवरी ॥४॥