भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य सर्वगत अखंड सगुण । केशवाचें ध्यान करी ब्रह्म

nitya sarvagat akhand sagun | keshavachen dhyan kari brahma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य सर्वगत अखंड सगुण । केशवाचें ध्यान करी ब्रह्म ॥१॥ ब्रह्मा सर्वकाळ सांगे साधूपाशीं । आणिक हे शेषीं तेंचि मानी ॥२॥ मनीं जो मानसीं नामामृत सार । सेविती सादर नामा म्हणे ॥३॥