भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी

nitya satyamit haripath jyasi

नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टि ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ॥४॥