भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य ध्यातां हरिचे चरण । करी भक्त दुःखहरण

nitya dhyatan hariche charan | kari bhakta duhkhaharan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य ध्यातां हरिचे चरण । करी भक्त दुःखहरण ॥१॥ चरणरज पवित्रता । सदा घ्यावेंचि माथा ॥२॥ लागला पाषाणा चरण । ती स्त्रीची जाली पावन ॥३॥ ऐसें चरणींचे मान । शरण एका जनार्दन ॥४॥