भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वहिलें धरिलें पोटीं

nirabhimanen namayasi dekhilen | sanvatyanen vahilen dharilen potin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वहिलें धरिलें पोटीं ॥१॥ सांवत्याचें अंतरीं झळके पीतांबर । नाम्यानें सत्वर वोळखिलें ॥२॥ धरुनियां दशी काढिला बाहेर । जाहला जयजयकार तया वेळीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहूनियां देव । मिठी घाली नामदेव चरणासी ॥४॥