भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरशून्य बिंबी आकार पाहतां

nirashunya bimbi akar pahatan

निरशून्य बिंबी आकार पाहतां । आपण तत्त्वता हरि एकु ॥१॥ तें रूप साबडे कृष्णा माजींवडे । सोंवळें उघडें शौच सदा ॥२॥ तेथें वर्ण व्यक्ति कल्पना हरपती । मनाच्या खूंटती गती जेथें ॥३॥ निवृत्ति नितंब सोवळा स्वयंभ । प्रकाशलें बिंब चहूंकडे ॥४॥