भजनी मालिका

भजने

निवृत्ति मुक्ताईचे वोसंडले नयन । करितो समाधान पांडुरंग ॥१॥ विसोबा खेचराचे भरोनि येती डोळे । परिसा तळमळे पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति मुक्ताईनें धरियेलें मौन । वटेश्वर सोपान त्यागियेला ॥१॥ समाधि पताकांची पडली सावली । उतरले खालीं योगीराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति मुक्ताईनें पाहुनि स्थळ डोळां । आलासे उमाळा ओसंडोनी ॥१॥ तात आणि माता गेलीसे येथून । तेव्हां आम्ही लहान पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखळा । मार्ग हा मोकळा आम्हां जाला ॥१॥ पांडुरंग पाश आवरिला आपला । म्हणोनि फुटला मार्ग आम्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति सोपान आणिक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकडे ॥१॥ देवासी गुह्यार्थ केला पां एकांत । ज्ञानदेवें हित आरंभिलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति सोपान मुक्ताई चवथी । अनेक विभूति ज्ञानेश्वरा ॥१॥ नामा पुंडलिक गरुड हनुमंत । परस भागवता बोलविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति सोपान मुक्ताई धाकुटी । धरियेली कंठी पांडुरंगें ॥१॥ कळवळिली मनीं करिती दीर्घ ध्वनी । आठविती मनीं ज्ञानदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥ आपुलेंज स्वहित करावें आपण । संतांच्या सन्माना चुकों नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं ॥१॥ बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे ॥१॥ सद्‌गुरुप्रसादें बोधिली नेटकी । गुहे गौप्य ताटी आड केलीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥ तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेवासंगें देव ऋषीश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ प्रतिपदीं देव निघाले बाहेर । केला नमस्कार समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं ॥१॥ गरुडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्तिराज समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥ पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥ पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिराज म्हणे आतां पंढारिनाथा । मुक्ताईला जपा अवघेजण ॥१॥ वेधली चित्तवृत्ति स्वरूपीं निमग्न । नाहीं देहभान मुक्ताईला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसें वाटे ॥१॥ हालतें गगन डोलती विमानें । गेलें देहभान अवघियांचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव