भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति सोपान मुक्ताई धाकुटी । धरियेली कंठी पांडुरंगें

nivrutti sopan muktai dhakuti | dhariyeli kanthi pandurangen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति सोपान मुक्ताई धाकुटी । धरियेली कंठी पांडुरंगें ॥१॥ कळवळिली मनीं करिती दीर्घ ध्वनी । आठविती मनीं ज्ञानदेव ॥२॥ विकळ जालें चित्त संत हे दुश्चित । नामा विकळ तेथ होत असे ॥३॥