भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली

nivruttiraj baisale samadhin suchit | chinmay te jyot ujalali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥ पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥ विठोबाचें ह्रदय आलेंसें भरून । झांकियेले नयन विवृत्तिराजें ॥३॥ पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥४॥ राही रखुमाई बैसल्या गहिंवरत । आणिक संत महंत वोसंडती ॥५॥ नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां । घाला आतां शिळा समाधीसी ॥६॥