भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेवासंगें देव ऋषीश्वर । उठावले भार वैष्णवांचे

nivruttidevasangen dev rushishvar | uthavale bhar vaishnavanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिदेवासंगें देव ऋषीश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ प्रतिपदीं देव निघाले बाहेर । केला नमस्कार समाधीसी ॥२॥ अवघियांसहित वैष्णव मंडळी । सवें वनमाळी चालताती ॥३॥ गोदातीरा जाया निवृत्ति उद्देशी । सह समुदायेंशी उठावले ॥४॥ नामा म्हणे घेतला नारायण संगें । चालिले अनेगें भक्तराज ॥५॥