भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति मुक्ताईचे वोसंडले नयन । करितो समाधान पांडुरंग

nivrutti muktaiche vosandale nayan | karito samadhan pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति मुक्ताईचे वोसंडले नयन । करितो समाधान पांडुरंग ॥१॥ विसोबा खेचराचे भरोनि येती डोळे । परिसा तळमळे पुंडलिक ॥२॥ नाना खेद करूनि सारिलें भोजना । जाती आचमना गंगेलागीं ॥३॥ आंचवले देव वैष्णव ते ऋषी । जाती समाधीसी चांगदेवा ॥४॥ जेवूनियां संत बैसले निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥५॥ नामा म्हणे सवें उठे नारायण । आले अवघेजण समाधीपाशीं ॥६॥