भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं

nivruttidev mhane chala gumphemadhin

निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे ॥१॥ सद्गुरुप्रसादें बोधिली नेटकी । गुहे गौप्य ताटी आड केलीं ॥२॥ दंड चक्राकार बांधिली चौकुन । आंत संतजन करिती वास ॥३॥ ऐसे गुफेमध्यें नाहीं नामदेव । म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥४॥ गैनीची मिरास घेतला प्रमाण । पूर्वभूमि जतन करित आस ॥५॥ निवृत्तिदेव म्हणे मुक्ताबाईच्या उत्तरें । भाजलें कीं कोरें कळों येईल ॥६॥