भजनी मालिका

भजने

नेणतिया ठायीं पाहुं जाय देवा । तों अवघें या केशवा व्यापियेलें ॥१॥ नेणतपण गेलें पाहतां पाहणें पडियेलें टक । अवघाचि हरिख वोसंडला ॥३॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला ॥१॥ योगियांचे मांदुस सज्जानाचें स्थळ । श्रम तो केवळ पाहतां जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणती ब्रह्मादिक ऐसें याचें कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे ॥१॥ न चुके न चुके भोगिल्यावांचुनीं । वायांचि तो मनीं शीण वाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥ पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळां गुंजहार ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥ आशा हे पाठी घेवोनी सांगतों । निचेष्ट निरूतें भरीन माजी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं ॥१॥ मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥ जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ॥१॥ रंकाहुनि रंक संतांचा सेवक । मी नामधाराक विठोबाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा । हें तों मज देवा समजेना ॥१॥ करूं कैसा जप करूं कैसें ध्यान । नाहीं माझें मन स्थिर देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेणें मंत्र तंत्र बीजाचा पसारा । जनार्दन सोईरा घडला मज ॥१॥ भक्ति ज्ञान विरक्ति नेणें पैं सर्वथा । मोह ममता चिंता कांहीं नेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणें वेदशास्त्र पुराण पठण । तेणें नामकिर्तन करावें ॥१॥ कलीमाजीं सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणे साही शास्त्रें तुज केशिराजा । स्वरूपें कुबजा काय होती ॥१॥ न मागें मी तैसा न मागें मी तैसा । न मागें मी तैसा कदा काळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव