भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणें साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा

nenen sadhan pasara | vrata tapachya nirdhara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणें साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा ॥१॥ आवडी गाऊं तुझें नाम । तेणें पुरती सर्वकाम ॥२॥ आणिक न करुं चावटी । आगमनिगम आटाआटी ॥३॥ न करीं साधन कांहीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥