भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे

nene ghatamat navhe kalavant | shastradnya pandit tohi navhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ॥१॥ रंकाहुनि रंक संतांचा सेवक । मी नामधाराक विठोबाचा ॥२॥ नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ । नव्हे मी वाचाळ तर्कवादी ॥३॥ नामा म्हणे राया विठोचा डिंगर । नामें पैलपार पावविलों ॥४॥