भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया

nenapanen mithi ghalin padara | baisen dvarant tayachiya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥ आशा हे पाठी घेवोनी सांगतों । निचेष्ट निरूतें भरीन माजी ॥२॥ लाभाचा हा लाभ येईल माझे हाती । मग काय चिंता करणें काज ॥३॥ चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांही ॥४॥