भजनी मालिका

भजने

नेम धरीं विठ्ठलामीं । पडुं नको वाउगा भ्रमीं । सांगतसे गृहस्थाश्रमीं । साधन सोपें ॥१॥ करी नामस्मरण । वाचे म्हणे नारायण । चुकेल पतन । यातायाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नोवरीया संगें वन्हाडीया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥ परीसाचेनि संगें लोहो होय सोनें तयाची भूषणे श्रीमंतासी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥ परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध ॥१॥ वाढवुनी जटा म्हणती ब्रह्माज्ञान । परी पतनालागुनी न चुकेचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न्याय मीमांसा सांख्य पातंजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥१॥ ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचे संतजन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशी। प्रतिपाळावें धर्मासी। व्यवहारासी न सांडी॥१ ॥ ऐका स्वधर्मविचारी । धंदा करी दोन प्रहर । सांगितलें साचार । पुरणांतरीं ऐसें हें ॥ २॥

रचनाकार: संत सेना

पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी ॥१॥ तैसें माझें मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें ॥१॥ शबरीची फळे उच्छिष्ट तीं खायें । कैसा राम होय सर्वपाणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंच वर्षीय बाळ खेळे नाना खेळ । मेळवोनि मेळ सवंगडियांचा ॥१॥ सवंगड्यांत खेळे विटीदांडु चेंडू । नामाचा छंद मुखी सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंचक पंचकाचा पसारा पांचाचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमाजी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ