भजनी मालिका
← भजनांकडे परत

नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न

novariya sangen var‍hadiya sohola | mande puranapolya mile anna

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥ परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥ जनी म्हणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥